इस्कॉनने वेगळी रथयात्रा काढणे चुकीचे, जगन्नाथ पुरीच्या राजाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्कॉनने वेगवेगळ्या वेळी रथयात्रा काढणे आणि स्नान यात्रा आयोजित करणे हे चुकीचे असून परंपरेविरोधात आहे, असे ओडिशा पुरीचे राजा गजपती महाराज दिव्यसिंह देव यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जगन्नाथ मंदिराच्या प्राचीन परंपरेच्या रक्षणाची मागणी केली आहे. गजपती महाराज दिव्यसिंह देब हे श्रीजगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्षदेखील आहेत.

इस्कॉन रथयात्रा अशा तारखांना आयोजित करत आहे, ज्या शास्त्रानुसार नाहीत. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. गजपती महाराजांनी उज्जैन येथील इस्कॉन मंदिराच्या वतीने 16 ते 25 जुलैदरम्यान मध्य प्रदेशातील 66 ठिकाणी रथयात्रा आयोजित करण्याच्या योजनेवरही आक्षेप घेतला. धार्मिक ग्रंथांनुसार रथयात्रा हा केवळ आषाढ शुक्ल द्वितीयेपासून सुरू होणारा 9 दिवसांचा उत्सव आहे.