विदेशात एमबीबीएस करणारे 86 टक्के विद्यार्थी नापास, एफएमजीईचा निकाल जाहीर; पालकांची चिंता वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने देशातील हजारो विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी परदेशात जाऊन एमबीबीएसची पदवी घेतात. हिंदुस्थानात प्रॅक्टिस करण्यासाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झमिनेशन अर्थात एफएमजीईची परीक्षा पास करावी लागते. या परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून यात 86 टक्के विद्यार्थी नापास झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

जून 2026 च्या निकालात 86 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत. जून 2026 च्या एफएमजीईच्या परीक्षेत देशभरातून एपूण 37 हजार 444 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी केवळ 5 हजार 86 विद्यार्थी पास झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी रशिया, अझरबैजान, कझाकिस्तान, किरगिझस्तान, उझबेकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, चीन, रोमानिया आणि फिलिपिन्स यांसारख्या देशांत जाऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु एफएमजीईची परीक्षा पास न झाल्याने त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले.

कालावधी परीक्षार्थी पास
जून 2025 – 36,039 – 6,705
डिसेंबर 2025 – 42,872-  10,262
जानेवारी – 2026 –  43,933 – 10,294
जून – 2026 – 37, 444 – 5,086