
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (एमएमसी) नोंदणीस पात्र असलेल्या राज्यातील सर्व सीसीएमपी अर्हताधारक डॉक्टरांच्या प्रलंबित अर्जाची तातडीने छाननी करून निश्चित कालमर्यादेत नोंदणी पूर्ण करावी, या प्रमुख मागणीसाठी आज आझाद मैदानात बीएचएमएस डॉक्टरांनी आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आयुष व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांवर राज्य सरकारने ठोस लेखी निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी डॉक्टरांनी केली. सर्व पात्र सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी तातडीने करावी, नोंदणी प्रमाणपत्र देण्याची कालमर्यादा जाहीर करावी, शासन निर्णयाची पूर्ण व एकसमान अंमलबजावणी करावी आदी मागण्या त्यांनी केल्या. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली.


























































