लखनौ विमानतळावर गो-अराऊंडनंतर दुसऱ्या प्रयत्नात एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग, राहुल गांधीही करत होते प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीहून लखनौला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे पहिल्या प्रयत्नात लँडिंग अयशस्वी झाल्याने गो-अराऊंड करावे लागले. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात अमाउसी विमानतळावर विमान सुरक्षित लँड झाले. या विमानात काँग्रेस नेते राहुल गांधी देखील प्रवास करत होते. दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यासाठी राहुल गांधी एअर इंडियाच्या विमानाने लखनौला गेले.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे AI 1717 हे विमान दुपारी 2.20 वाजता दिल्लीहून लखनौकडे रवाना झाले. लखनौमध्ये नियोजित वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता हे विमान लँड होणार होते. त्यानुसार लखनौ येथील अमाउसी विमानतळावर विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र पहिला प्रयत्न फसला. यानंतर विमानाने गो-अराऊंड केले. अखेर दुसऱ्या प्रयत्नात विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले.