जिथे महिला सुरक्षित नाहीत, तिथे योजना आणि कार्यक्रमांबद्दल बोलण्यात अर्थ नाही; प्रियांका गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या जमुई जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड आणि मारहाण प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे भयंकर आहे, महिलांविरोधात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. आपल्या रस्त्यांवर आपण महिलांची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही तर मोठ्या योजना आणि कार्यक्रंमांबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, “हे भयंकर आहे. महिलांवरील गुन्हे वाढतच चालले आहेत. महिलांसाठी असुरक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. ती नेहमीच असुरक्षित होती, पण आता महिलांवरील हिंसाचारात प्रचंड वाढ झाली आहे. मला वाटते की, जर आपण आपल्या रस्त्यांवर महिलांची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नसू, तर मोठ्या योजना आणि कार्यक्रमांबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे ही खरोखरच अशी गोष्ट आहे ज्यावर आपण सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे. जिथे कुठे राज्य सरकारे आणि विशेषतः केंद्र सरकार सत्तेत आहे, त्यांनी महिलांना सुरक्षित वातावरण कसे देता येईल यावर तातडीने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.