ओडिशामध्ये जमुई घटनेची पुनरावृत्ती, मित्रासोबत बाईकवर जाणाऱ्या तरुणीचा जमावाकडून विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशात बिहारमधील जमुई घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मित्रासोबत बाईकवरून जाणाऱ्या तरुणीवर जमावाने हल्ला करत तिचा विनयभंग केला. ओडिशातील ढेंकनाल-कपिलांश रोडवर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरुणी सोडून देण्याची विनंती करताना दिसत आहे. मात्र उपस्थित लोक तिच्याशी आक्रमकपणे वागताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 सप्टेंबर रोजी घडली. हे जोडपे कपिलाश पर्यटन स्थळाला भेट देऊन परतत होते. काही स्थानिकांनी जोडप्याला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेच्या मूळ कारणाचा तपास सुरू आहे.