Ratnagiri News – विषारी पावडर खायला घालून कुत्र्यांच्या पिल्लाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शहरातील कोकणनगर येथे अज्ञाताने कुत्र्यांच्या पिल्लांना विषारी पावडर खायला टाकून त्‍या प्राण्यांची वेदना व यातना करुन मारले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहम्मद सैफ समिर काझी (26) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्‍यानुसार, खबर देणार राहत असलेल्या सनराईज रेसिडेन्सि जवळ अज्ञाताने कुत्र्यांच्या लहान पिल्लांना विषार पावडकर खायला घातली. त्‍यामुळे त्‍या पिल्लांचा वेदना व यातना तसेच छळ करत त्‍यातील एका पिल्लाच्या मृत्‍यूस कारणीभूत ठरला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात बी.एन.एस 2023 चे कलम 325 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (अ),प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.