
तुर्कस्तानमध्ये गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. प्राथमिक अंदाजानुसार भूकंपाची तीव्रता ५.८ होती. दियारबाकीर, आदियामान आणि सानलिउर्फा यांसह आसपासच्या अनेक प्रांतांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक अहवालानुसार, दियारबाकीरमध्ये भूकंपाचा धक्का अधिक तीव्रतेने जाणवला.
प्राथमिक अहवालानुसार भूकंपाची तीव्रता ५.५ होती, जी नंतर ५.८ अशी सुधारित करण्यात आली. सध्या, नुकसान किंवा जीवितहानीबद्दल नेमकी माहिती मिळालेली नाही. भूकंपाचे धक्के शान्लिउर्फा, तसेच आदियामान, मलात्या, दियारबाकीर आणि गाझियानटेप येथे जाणवले. अधिकाऱ्यांच्या मते, कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय पथके विविध भागांना भेट देत आहेत.































































