
युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज या बँक कर्मचाऱ्यांच्या शिखर संघटनेने 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान संपाची हाक दिली आहे. सलग 5 दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्र सरकारने 27 सप्टेंबर रोजी येणाऱ्या रविवारी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ग्रामीण बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
नियोजित वेळापत्रकानुसार, सप्टेंबर महिन्याचा चौथा शनिवार (26 सप्टेंबर) आणि रविवार (27 सप्टेंबर) यामुळे बँका आधीच बंद राहणार होत्या. त्यानंतर लगेचच 28 सप्टेंबरपासून बँक युनियनने तीन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे.





























































