मिरवणुकीतील गर्दीवर एआयची नजर, विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलीस सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. मिरवणुकीत गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती होऊ नये, वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, ध्वनिप्रदूषण होणार नाही या सर्व बाबींची पोलिसांकडून खबरदारी घेतली जाणार असून त्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे.

बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठय़ा संख्येने भाविक रस्त्यावर उतरतात. त्यामुळे शहरातील लालबाग, परळ, जुहू, वर्सोवा, पवई आदी ठिकाणी भाविकांची तोबा गर्दी उसळते. त्या पार्श्वभूमीवर लालबाग-परळसारख्या गर्दीने हाऊसफुल्ल असणारा परिसर तसेच गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, पवई, मढ-मार्वे या चौपाटय़ांवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. गर्दी होणार नाही, मिरवणुका वेळेत पूर्ण होतील, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी ड्रोन, सीसीटीव्हीबरोबरच एआयचा प्रभावी वापर करणार असल्याचे तसेच चौपाटय़ांवर विसर्जन सुरळीत व व्यवस्थित पार पाडावे याकरिता अतिरिक्त तराफे, ट्रॉली, व्रेनची व्यवस्था केल्याचे सहआयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.

असा होणार वाहतुकीत बदल

 कफ परेड आणि बधवार पार्क परिसरात वाहतुकीची काsंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिमहत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त या परिसरात प्रवास टाळावा.
 मेट्रो जंक्शनकडे जाणाऱया मार्गावर गणपती विसर्जनाच्या दिवशी वाहतूककाsंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांना मेट्रो जंक्शनच्या दिशेने वाहतूक टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 गोल देऊळ ते पद्मश्री गोवर्धन बाप्पा चौक पटेल रोडदरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
 गिरगाव, ठाकूरद्वार, व्ही. पी. रोड, जेएसएस रोड, एस. व्ही. पी. रोड, राजाराम मोहन रॉय रोड आणि त्याकडे जाणाऱया मार्गांवर वाहतूककाsंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथून प्रवास करण्याचे टाळावे.
 विसर्जनादिवशी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहणार आहे. सहा सहपोलीस आयुक्त, नऊ अपर पोलीस आयुक्त, 38 उपायुक्त, 66 सहाय्यक आयुक्त, 3 हजार 213 अधिकारी, 18 हजार 940 कर्मचारी असा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसआरपीएफ, आरएएफ, पर्ह्स वन, क्यूआरटी, दंगल नियंत्रण पथक, अॅण्टी ड्रोन पथक, होमगार्ड, मसुब जवानदेखील तैनात ठेवण्यात येणार आहेत.