ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हच्या भुयारी मार्गाला 57 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील आँरेज गेट ते मरीन ड्राईव्ह असा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या वतीने एमएमआरडीएला 57 कोटी रुपयांचे दुय्यम कर्ज देण्यास आज नगरविकास विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली, तर ठाणे-बोरिवली दरम्यानच्या भुयारी मार्गासाठी नगरविकास विभागाने 153 कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यात आली.

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असा बोगदा एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येत आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग (ईस्टर्न फ्री वे), अटल सेतू आणि मरीन ड्राईव्ह व कोस्टल रोडला जोडणारा हा मार्ग सुमारे 9 ते 10 किमी लांबीचा आहे. त्यापैकी सुमारे सात किमी मार्ग भूमिगत आहे. या प्रकल्पाअंतर्गत दोन स्वतंत्र बोगदे उभारण्यात येत आहेत. त्यात तीन अधिक तीन पदरी मार्ग असतील. सध्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या रस्ते मार्गे प्रवासासाठी सुमारे तीस ते चाळीस मिनिटे लागतात. पण भुयारी मार्ग पूर्ण झाल्यावर हा प्रवास पाच मिनिटांवर येईल.

ठाणे-बोरिवली प्रवास पंधरा मिनिटांत

सध्या ठाणे आणि बोरीवली प्रवास करण्यासाठी घोडबंदर रोडवरून दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. या मार्गावर नेहमीच वाहतूककाsंडी असते. पण ही वाहतूककाsंडी पह्डण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून सुमारे 11.80 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ठाणे बोरिवली हा प्रवास फक्त पंधरा मिनिटांवर येईल.