
ग्रेटर नोयडा येथील यमुना एक्सप्रेस वेवर एका प्रवासी बसला आग लागून 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
#WATCH | Greater Noida, UP | A passenger bus caught fire on the Yamuna Expressway. More details awaited. pic.twitter.com/6diWQ3dUcP
— ANI (@ANI) September 23, 2026
ही बस दिल्लीहून उत्तर प्रदेशातील महोबा येथे जात असताना यमुना एक्सप्रेस वेवर नोयडा एअरपोर्टजवळ बसने पेट घेतला. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागली तेव्हा बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे बसमध्ये एकच गोंधळ आणि घबराट उडाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी बसच्या खिडक्यांमधून बाहेर उड्या मारल्या. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने मदत पुरवण्यासाठी आणि बाधित प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले.




























































