युवासेनेने केला गणेश मंडळांचा सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा युवासेनेने सन्मान केला आहे. उत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या ३० हून अधिक मंडळांना भेटी देत युवासैनिकांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

सामाजिक उपक्रम, गणेशोत्सवातील नियोजन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या डोंबिवली परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांचा युवासेनेने सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी विभाग युवाधिकारी विजयआनंद अय्यंगार, पंकज कोटकर, शाखा युवाधिकारी अनुज मोरे, रोहन सकट, उपशाखा युवाधिकारी आनंदा तांबेकर, कृष्णा यादव, राहुल शिंदे, नीतेश गिमवकर, श्रुती गुरव, हर्षल नाईक यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलिसांचा गौरव:

डोंबिवलीतील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले.

तसेच गणेशोत्सवात दिवसरात्र एक करून जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस आणि वाहतूक पोलिसांचादेखील युवासेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ व्हावी हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.