
जमुई येथील दहावीच्या विद्यार्थिनीच्या छेडछाडीची घटना ताजी असतानाच आता बिहारमधील समस्तीपूरमधूनही अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. समस्तीपूर येथे भररस्त्यात एका तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करत थेट भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओचा संदर्भ देत तेजस्वी यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, समस्तीपूरमध्ये अल्पवयीन मुलीची सर्वांसमोर काही तरुणांनी केलेली छेडछाड हा थेट पुरावा आहे की, भाजपशासित बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. राज्यातील सत्तेतील निर्लज्ज मंत्री नेहमीप्रमाणे या घटनेलाही किरकोळ घटना म्हणून संबोधून हात झटकून मोकळे होतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
समस्तीपुर में नाबालिग लड़की के साथ सरेआम युवकों द्वारा छेड़खानी प्रत्यक्ष प्रमाण है कि बीजेपी शासित बिहार में कानून व्यवस्था का जनाजा निकल चुका है। अब निर्लज्ज मंत्री इसे भी छिटपुट घटना बताकर पल्ला झाड़ लेंगे।
जब प्रदेश का मुख्यमंत्री आपराधिक प्रवृति का हो, जो जाति देखकर… pic.twitter.com/LlNSzNB2U3
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) September 24, 2026
पुढे बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, राज्य शासनावर थेट निशाणा साधला. जेव्हा प्रदेशचा मुख्यमंत्री हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असतो आणि जो आरोपींची जात पाहून त्यांचा सन्मान करतो, तेव्हा त्या प्रदेशात अशी अराजक परिस्थिती निर्माण होणे अत्यंत साहजिक आहे, असे ते म्हणाले. पुढे सवाल उपस्थित करताना त्यांनी म्हटले की, आता हे जाततज्ज्ञ मुख्यमंत्री गुन्हेगारांची जात पाहूनच कारवाई करणार की नेहमीप्रमाणे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणार? तसेच केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी नेहमीप्रमाणे यात आपले नातेसंबंध शोधत बचावासाठी पुढे येतील, असे म्हणत त्यांनी संपूर्ण परिस्थितीवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.



























































