
वागळे इस्टेट येथील एका कंपनीत रात्री भीषण आग लागली. एका पाठोपाठ एक कानठळ्या बसविणारे स्फोट होऊन लागलेल्या आगीत कंपनी बेचिराख झाली. या दुर्घटनेत कोणती मनुष्यहानी झाली का याची माहिती मात्र रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. वागळे इस्टेट परिसरात प्रशांत स्वीटशेजारील एका कंपनीत रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. आधी स्फोटाचा आवाज आल्यानंतर कंपनीत आगीचे लोळ उसळले. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशात प्रचंड घबराट पसरली. लोक सैरावैरा धावत होते.




























































