शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचा नैतिक अधिकार आहे का? आदित्य ठाकरे यांचा गद्दारांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंमत, ताकद, जिद्द, निष्ठा हा विचार मनात येतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विधानभवनात शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गद्दारांना केला. रांजणगाव शेणपुजी येथे हिंदुर्‍हदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित क्रिकेट चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भगवे फुगे सोडून व बॅटिंग करीत उद्घाटन केले.

याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, कृष्णा डोणगावकर, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, विभागप्रमुख कैलास हिवाळे आदींची उपस्थिती होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे जिंदाबाद, आदित्य ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी संभाजीनगरला नेहमी येतो. गद्दारी झाल्यानंतरही आलोच प्रत्येकवेळी येथून प्रेरणा घेऊन जातो. माझ्या बाजूला निष्ठावंत शिवसैनिक आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे सैदव मदतीला धावून जातात. कुठेही काही घटना घडली की शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मी फोन करण्यापूर्वी दानवे त्या ठिकाणी मदतीला पोहचलेले असतात. सध्या राज्य ओके नाही, पण ते बसलेत ओके होऊन. कुणी 50 खोके घेतले, कुणी 9 लायन्सस घेतले, तरी यांचे पोट भरले नाही. एकाच्या राक्षसी महत्वकांक्षापोटी 40 गद्दार सुरतेत पळले, तेथून गुहाटीत गेले, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावले जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंमत, ताकद, जिद्द, निष्ठा हा विचार मनात येतो. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विधानभवनात तैलचित्र लावण्याचा अधिकार आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

शेतकर्‍यांच्या कापसाला भाव नाही, अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही, राज्यातील उद्योग गुजरातेत पळून गेले. कृषीमंत्री शेतकर्‍यांना भेटायला तयार नाही. बेरोजगारांना रोजगार नाही, महागाई वाढत चालली आहे. घटनाबाह्य सरकारला काही, देणेघेणे राहिलेले नाही. सरकारच्या विरोधात वङ्कामुठ आवळण्यासाठी एकत्र यावे लागेल, तुमची मला साथ हवी, साथ देणार का असे विचारताच समोरच्या जयसमुदायाने हात उचांवत वज्रमुठ आवळत साथ देणार, तुमच्या सोबत कायम राहणार असा एकच नारा घुमला.