
दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी सरकारने आज पुन्हा एकदा विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव एकमताने जिंकला. सभागृहात आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला, मतदानादरम्यान 62 पैकी 54 आप आमदार उपस्थित होते. ‘आप’ने स्पष्ट बहुमत मिळवले. आपला 54 मते मिळाली तर एक मत विरोधात पडले. भाजपचे दिल्ली विधानसभेत केवळ 8 आमदार आहेत.
दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान केजरीवाल म्हणाले की, येत्या निवडणुकीत तुम्हाला दिल्ली विधानसभा रद्द करायची आहे, असे सांगून मते मागायला जा, जर त्यांनी विधानसभा रद्द केली तर मी तुमच्यासाठी काम करत राहीन. लोकसभा निवडणुकीनंतर पेंद्र सरकार दिल्ली विधानसभा रद्द करेल, असा आरोपही केजरीवाल यांनी भाजपवर केला. भाजपला भविष्याची भीती वाटत असेल तर ती केवळ आम आदमी पार्टीमुळेच वाटत आहे. त्यामुळेच त्यांना आम आदमी पक्ष पह्डायचा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप हरला नाही तर आम आदमी पक्ष 2029 पर्यंत देशाला भाजपमुक्त करेल हे नक्की, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले. आपने 26 नोव्हेंबर 2012 रोजी नोंदणीसाठी अर्ज केला होता म्हणजेच ‘आप’ची स्थापना 12 वर्षांपूर्वी झाली. देशात सुमारे 1350 पक्ष आहेत. परंतु, आप आता भाजप आणि काँग्रेस पक्षानंतर देशातील तिसरा सर्वात मोठा पक्ष बनला आहे, असे केजरीवाल यावेळी म्हणाले.
16 मार्चला मी स्वतः कोर्टात नक्की येईन
मला कोर्टात यायचे होते, परंतु दिल्ली सरकारचा विश्वासदर्शक ठराव आला. दिल्ली सरकारचे बजेट सत्र मार्चच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत चालेल. त्यानंतर 16 मार्चला मी स्वतः कोर्टात उपस्थित होईल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी न्यायालयाला दिले. दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडीच्या समन्सवर हजर न राहिल्याने ईडीने कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना आज कोर्टात उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु अरविंद केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टात उपस्थित राहिले. कोर्टाने यावर पुढील सुनावणी 16 मार्चला ठेवली आहे.

























































