
>> आराधना कुलकर्णी
घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्र सोहळ्याच्या नऊ दिवसांत देवीची नऊ रूपे पुजली जातात. ही आदिशक्ती सर्व भूतमात्रांत मातृरूपाने, शक्तिरूपाने वसलेली आहे. या आदिशक्तीचे रूप म्हणून मातृत्वाचे वहन करणाऱया स्त्री शक्तीकडे पाहिले जाते. तिचे स्वरूप सद्गुणांसाठी प्रेरक, तारक आणि दुर्गुणांसाठी मारक असे त्रिविध आहे. आदिशक्ती ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. शक्तीचा हा उत्सव मनाच्या आतही साजरा झाला पाहिजे. आदिशक्तीसोबत सकल स्त्राr शक्तीचा, तिच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करू या.
दूरदर्शनवर एका कार्पामात ऐकलेला हा प्रसंग. यूपीएससी कोचिंग क्लासची एक गरीब घरातील विद्यार्थिनी एक दिवस डोईवरचे केस पूर्णपणे साफ करून क्लासला आली. कारण घरचे लोक तिचे शिक्षण थांबवून लग्न लावण्याच्या प्रयत्नात होते व त्यात त्यांना यश मिळू नये व म्हणून तिने हा प्रकार केला. हा प्रसंग काल्पनिक नसून अगदी अलीकडचा आहे. प्रसंग सांगणारीने खूप कळकळीने प्रश्न विचारला, “कब बदलेंगे ये घरवाले?”
या प्रसंगातून त्या मुलीचा आत्मविश्वास, शिक्षणाचा निर्धार आणि दृढ निर्णयशक्ती दिसून आली आणि जरी तिचे अतिशय कौतुक वाटले तरीही मन सुन्न झाले ते घरच्या लोकांमुळे. मुलगी आजही डोईजड वाटतेय का? शिक्षण खर्चापेक्षा तिच्या लग्नाच्या खर्चाचा अधिक विचार का? एकदा तिची रवानगी सासरी केली की संबंध संपतो का? दुर्दैवाने काही सामाजिक वर्गात या प्रश्नांची उत्तरे आजही होकारार्थी आहेत.
स्वातंत्र्य, समता हे दोन्ही हक्क स्त्रियांना आहेत हे निर्विवाद असण्याच्या तसेच स्त्रिया सर्व क्षेत्रांत अग्रेसर असण्याच्या या काळात असे विचार अजूनही आहेत. यावरून स्त्राr सक्षमीकरणाची वाटचाल अद्याप पुष्कळच बाकी आहे हे स्पष्ट होते. मन्नू भंडारींची एक काव्यपंक्ती…
एक पुरुष की सुलझी हुई दृष्टी ही
स्त्राr के कोई उलझनो को उबार लेती है
मग तो पुरुष पिता, पती, भाऊ, मुलगा… कोणत्याही भूमिकेत असो. येथे स्त्राr किंवा पुरुषाच्या श्रेष्ठत्वाचा काही प्रश्न नाही. प्रत्येक आयुष्य विविध नात्यांनी अनेक पदरी बनले आहे, जे परस्परांवर अपरिहार्य परिणाम करणारे असतात. ते अनेकांचे संमिश्र सहजीवन असते.
यात स्त्री, पुरुष हे दोन्ही समान महत्त्वाचे घटक आहेत. हा डोळसपणा येण्यासाठी शेकडो वर्षे खर्ची पडली आहेत. मात्र ही मान्यता अद्याप तात्त्विक पातळीवरच तरंगते आहे असे दिसते. त्याला प्रत्यक्ष कृतीची हवी तशी संपूर्ण जोड आजही नाही. घरातूनच जर असहकार असेल तर इतरांकडून काय अपेक्षा?
स्त्राr ही शारीरिकदृष्टय़ा नाजूक आहे. त्यामुळे ती सदैव संरक्षणातच राहिली पाहिजे. बालपणी वडील, तरुणपणी नवरा व म्हातारपणी मुलाने सांभाळ करण्याची ती जणू एक जोखमीची वस्तू आहे. खरे तर ही पारंपरिक प्रतिमा स्त्रिया आज सर्व क्षेत्रांत मोडून काढत आहेत. कारण बुद्धिमत्ता ही निसर्गदत्त असते. तिचे प्रमाण लिंगनिहाय ठरत नाही, पण तिच्या विकासाला मिळणारी अनुकूलता विषम असल्यामुळे प्रमाण तुलनेने कमी दिसते. या दुर्बल प्रतिमेमुळेच स्त्रियांसाठी साध्यासुध्या नोकऱयाच बऱया. कठीण नोकऱया त्यांना झेपणार नाहीत ही आणखी एक सामाजिक मानसिकता.
तथापि परिस्थिती वेगळी आहे हे आज स्त्रियांनी सिद्ध केले आहे. विचार क्षमता, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता…कोणत्याही बाबतीत स्त्राr पुरुषांपेक्षा कमी नाही. पुरुष सहकारी जे काही करतो आणि करू शकतो त्या सर्व गोष्टी करण्यास त्या सक्षम आहेत हे त्यांनी जागतिक पातळीवर सिद्ध केले आहे. हिंदुस्थानी स्त्राrदेखील जीवनाच्या सर्व क्षेत्रांत अग्रेसर होत आहे. ती कुठेही मागे राहत नाही. बौद्धिक कौशल्य व शारीरिक क्षमतांचा कठीणपणे कस पाहणाऱया कार्यक्षेत्रातील स्त्रियांच्या काही प्रातिनिधिक उदाहरणांवरून हे अधिक स्पष्ट होईल.
विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अदिती पंत-समुद्र वैज्ञानिक, मंगला नारळीकर-गणितज्ञ, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पहिल्या अध्यक्ष शास्त्रज्ञ- चंद्रमा शाह, हिंदुस्थानची मिसाईल वुमन- टेसी थॉमस, रॉकेट वुमन ऑफ इंडिया- रितू करीधन, हिंदुस्थानची व्हॅक्सिन गॉडमदर- गगनदीप कांग, पोलर वुमन- मंगला मणी, परिस्थितीचे आव्हान स्वीकारून, स्वतचा जीव जोखमीत घालून व्हॅक्सिनच्या शोध लावणाऱया कोविड योद्धय़ा, आयसीएमआरच्या वैज्ञानिक महिला डॉ. प्रिया अब्राहम, डॉ. संघमित्रा पाटील, डॉ. निवेदिता गुप्ता इत्यादी ही तर अगदीच ताजी उदाहरणे.
हिंदुस्थानी सैन्यदलात 1989 पर्यंत सैन्यात केवळ नर्सिंग व डॉक्टर्स होऊ शकणाऱया स्त्रियांना नंतर स्थलसेना, वायुसेना व नौसेना तिन्ही दलांमध्ये प्रवेश मिळू लागला. तोफखाना रेजिमेंटमधील तीन महिला अधिकारी चीन सीमेवर, तर दोन पाकिस्तान सीमेवर तैनात आहेत. नौदलातील पहिली व्हाईस अॅडमिरल शीला सामंत मथाई, पहिली फायटर पायलट कॅप्टन अभिलाषा बराक यांची उदाहरणे पाहता परामाच्या क्षेत्रात स्त्रिया कुठेच कमी नाही हे सिद्ध होत नाही काय? जिवाणू, विषाणू व देशाच्या शत्रूंवर मात करणाऱया या महिला म्हणजे रणरागिणीची रूपे नव्हेत काय?
नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने एकूण 107 पदकांची लयलूट करीत देशाची मान उंचावली आहे. त्यात वैयक्तिक, सांघिक व संमिश्र प्रकार मिळून 50 पदकांचे श्रेय महिला क्रीडापटूंना जाते. कुठे कमी पडल्या आहेत स्त्रिया? याशिवाय साहित्य, कला व सांस्कृतिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, विविध उद्योग-व्यवसाय इत्यादी क्षेत्रांतील अगणित स्त्रियांची नावे इथे कशी बरे घ्यावीत? यातून हे स्पष्ट होते की मातृत्व, मासिक धर्म यांच्यामुळे येणाऱया शारीरिक मर्यादा, पुरुषसत्ताक समाज पद्धती, कौटुंबिक जबाबदाऱया, या सर्वांतून येणाऱया सांस्कृतिक दडपणातून मार्ग काढत आजची स्त्राr मुक्त होत आहे. केवळ कौटुंबिकच नव्हे, तर सामाजिक व राष्ट्रीय कर्तृत्व गाजवते आहे. या विविध रूपांतील स्त्राr शक्तीचा श्रद्धापूर्वक जागर करण्याचा एक महोत्सव आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत आहे तो म्हणजे नवरात्र.
घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्र सोहळ्याच्या नऊ दिवसांत देवीची नऊ रूपे पुजली जातात. घराघरांतील उपास, व्रतवैकल्ये, पूजा, जागरणे यांसोबतच अनेक मंडळांतर्फे सार्वजनिकरीत्याही हा सण मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. संपूर्ण वातावरण मंगलमय व उत्साहपूर्ण चैतन्याने भारलेले असते. ही आदिशक्ती सर्व भूतमात्रांत मातृरूपाने, शक्तिरूपाने वसलेली आहे. या आदिशक्तीचे रूप म्हणून मातृत्वाचे वहन करणाऱया स्त्राr शक्तीकडे पाहिले जाते. आदिशक्ती ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. तिचे स्वरूप सद्गुणांसाठी प्रेरक, तारक आणि दुर्गुणांसाठी मारक असे त्रिविध आहे. स्त्रियांमध्येही हे क्षमतागुण आहेत. परिस्थितीनुसार कधी दुर्गा, तर कधी गौरी बनून कुटुंब आणि व्यवसाय दोन्ही आघाडय़ांवरील स्त्रिया याच भूमिका पार पाडत असतात.
नवरात्र थाटामाटात साजरे करणे, विविध सांस्कृतिक कार्पाम करणे, नऊ दिवस नऊ रंगांच्या नवीन साडय़ा सर्व मॅचिंग्जसह परिधान करणे या गोष्टींचा आनंद जरूर घ्यावा. हे झाले बाह्य साजरेपण. शक्तीचा उत्सव मनाच्या आतही साजरा झाला पाहिजे. देवीसोबत ‘स्व’रूपाचाही विचार करावा. स्वततील गुण व शक्तिस्थाने जाणून घ्यावीत.
देवी सुरक्षा, शांती, ज्ञान व आनंद यांचे वरदान देते. तशी सूचक प्रतीके तिच्या अष्टभुजांमध्ये आहेत. या प्रतीकांची केवळ पूजा न करता भावना व विचार एकत्रित करून त्यांचा अर्थ जाणला तर आपले वर्तन कसे असावे हे लक्षात येते व अनुरूप वृत्ती विकसित होते अन्यथा नुसतेच कर्मकांड घडते. या नवरात्रात आदिशक्तीसोबत सकल स्त्री शक्तीचा, तिच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करू या.
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम।।
(लेखिका अनुवादक आहेत)




























































