
अभिजित तुकाराम धुमाळ (48) यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, बहीण, पुतणे, भाची असा परिवार आहे. पुणे दै. ‘सामना’तील कर्मचारी धनंजय धुमाळ यांचे ते कनिष्ठ बंधू होते. बिबवेवाडी येथे राहणारे अभिजित धुमाळ हे गेल्या काही वर्षांपासून मधुमेहामुळे त्रस्त होते. वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
































































