
पुणे शहरातील विविध गंभीर गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपींना खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. अनिकेत विनायक जाधव (वय 23), ओमकार संतोष सातपुते (वय 18) आणि तेजस गणेश निवंगुणे (वय 20, सर्व रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच्या खूनाचा प्रयत्न करून फरार झालेले त्रिकुट वाल्हे गावातील एका डोंगराजवळ असल्याची माहिता पोलीस अंमलदार रमेश चौधर व गजानन सोनवलकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
गुन्ह्यात मागील चार वर्षांपासून फरारी असलेला आरोपी वारजे गावठाण परिसरात आल्याची माहिती पोलिस नाईक नितीन रावळ आणि विवेक जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून विशाल नारायण सरकार याला ताब्यात घेतले. त्याला हवेली पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे एसीपी सुरेन्द्रकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, एपीआय संदीप बुवा , पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, अतुल साठे, प्रविन राजपूत, रवींद्र फुलपगारे, मधुकर तुपसुंदर, संजय भापकर, रमेश चौधर, नितीन कांबळे, गजानन सोनवलकर , दुर्योधन गुरव, अमोल आवाड, विजय कांबळे, अमर पवार, हनुमंत कांदे यांनी केली.




























































