
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
नववर्षाच्या स्वागताच्या दिवशीच परळीत हेल्मेटसक्तीची कारवाई केल्याने परळीकरांच्या नववर्षाची सुरुवात थोडी कडू झाली. नेहमीप्रमाणेच शहर आणि संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच दुचाकी अडवून 500 रु दंड दिल्याशिवाय गाडी न सोडल्याने दुचाकीस्वार चांगलेच मेटाकुटीला आलेले दिसले.
डिसेंबर महिन्यात सुरू झालेली हेल्मेटसक्ती बीडच्या वाहतूक शाखेच्या पथकाने परळीत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या जात आहेत मात्र परळी परिसरातल्या अवैध वाहतुकीवर कुठलीच कारवाई होत नसल्याने नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.या अवैध वाहतूकीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. यावर शहर, संभाजीनगर, ग्रामीण पोलीस गप्प असते. बीडची वाहतूक शाखाही परळी परिसरात होत असलेल्या अवैध वाहतुकीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करतांना दिसत नाही.




























































