
वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पॅक्टिकलप्रमाणे शिक्षण देणारी कौशल्य प्रयोगशाळा, रोग प्रतिकारशक्तीशास्त्र्ा संशोधन पेंद्र, शंभर वर्षांचा गौरवशाली इतिहास सांगणारा माहितीपट आणि टपाल तिकीट काढून झालेला गौरव अशा कार्यक्रमांनी आज पालिकेच्या नायर रुग्णालयाचा शतक महोत्सव पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नायरमधील विविध उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.
नायरमध्ये सुरू करण्यात आलेल्या दोन वैद्यकीय कोशल्य प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना मानवी प्रतिकृती वापरून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाणार आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणखी एका वैद्यकीय काwशल्य प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले. शिवाय कोरोना काळात नायरमधील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱयांना आलेल्या अनुभवातून व आठवणींतून साकारलेल्या कथा, अनुभव, कविता यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ‘कोविड रेमिनिसेस’ पुस्तकाच्या स्वरूपात केलेले संकलनही प्रकाशित करण्यात आले. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अनुभव घेता यावा यासाठी ‘स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम’चे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. यावेळी चित्रपट निर्माते विकास देसाई यांच्या सत्कारही करण्यात आला.
अत्याधुनिक कॉम्प्युटर प्रयोगशाळा
सद्यस्थिती वैद्यकीय शिक्षणामध्ये संगणकीय शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी नायर रुग्णालयाच्या औषधशास्त्र्ा विभागाच्या वतीने कॉम्युटर प्रशिक्षण प्रयोगशाळाही सुरू करण्यात आली आहे. याआधी औषधांचा शरीरावर होणारा परिणाम पाहण्यासाठी छोटय़ा प्राण्यांचा वापर केला जात होता. मात्र हा वापर अयोग्य ठरविण्यात आल्यामुळे संगणकीय प्रयोग शाळा उपयुक्त ठरणार आहे.
औषधशास्त्रातील विविध संकल्पना ठराविक सॉफ्टवेअरच्या साहाय्याने शिकविता येतात. संगणकाच्या मदतीने प्रशिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा वैयक्तिक अनुभव मिळणार आहे. ज्ञानाजर्नाच्या क्षमतेनुसार तसेच वेळेच्या सोयीनुसार विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील. अवघड प्रयोग सोप्या पद्धतीने शिकायला मिळणे आणि त्यांचा पुन्हा पुन्हा अनुभव घेता येणे, यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान उत्तम पद्धतीने आत्मसात करता येणार आहे.
संसर्गजन्य रोगांच्या संदर्भात प्रतिकारशक्ती विषयक अभ्यास करण्यासाठी नायर रुग्णालयामध्ये रोगप्रतिकारशक्तीशास्त्र संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे संसर्गजन्य रोगांमध्ये सहयोगी संशोधन, फ्लो सायटोमेट्रीमध्ये फेलोशिप (अभ्यासक्रम), स्टेम सेल संशोधनामध्ये मदत आणि रुग्णांमध्ये असलेल्या रोगप्रतिकारशक्तीची माहिती मिळवून पुढील दिशा ठरवण्यासाठी मदत होणार आहे.






























































