अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, काळजी घेत असल्याची दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. आज आपली कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे अक्षयने म्हटले आहे. आपण होम क्वारंटाईन असून सर्वतोपरी काळजी घेत आहोत, माझ्या संपर्कात जो कोणी आले आहे त्यांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी असे आवाहन अक्षयने केले आहे. तसेच यातून बरा होऊन लगेच कामाला लागेन असेही अक्षयने म्हटले आहे.


यापूर्वी रणबीर कपूर, आलिया भट, संजय लीला भन्साली यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीही होम क्वारंटाईन होत काळजी घेतली होती. तसेच माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकरलाही कोरोनाची लागण झाली होती. नंतर सचिनला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.