
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते असिफ बसरा यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येने बॉलिवूडला आणखी एक जबरदस्त धक्का बसला असून इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. Actor Asif Basra suicide
Film actor Asif Basra was found hanging in a private complex in Dharamshala. Forensic team is at the spot and police is investigating the matter: SSP Kangra Vimukt Ranjan. #HimachalPradesh (Picture credit: Asif Basra’s website) pic.twitter.com/nxpWNLi8VU
— ANI (@ANI) November 12, 2020
असिफ यांनी काय पो छे, ब्लॅक फ्रायडे, वन्स अपॉन अ टाईन इन मुंबई,लम्हा, पारझानिया या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर नुकताच रिलीज झालेली पाताल लोक ही त्यांची अखेरची वेब सिरीज ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी वन नाईट विथ किंग या चित्रपटात काम केले आहे.
असिफ हे गेल्या पाच वर्षांपासून हिमाचल प्रदेशमधील मॅकलॉडगंज येथे भाड्याच्या घरात राहात होते. तेथे त्यांच्या सोबत त्यांची परदेशी गर्लफ्रेंड देखील राहायची. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा होती. दरम्यान असिफ हे गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे.




























































