
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘मी टू’च्या मोहिमेत लैंगिक छळाचे आरोप झाल्यानंतर केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले माजी मंत्री एम. जे. अकबर हे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मैं भी चौकीदार’ या अभियानात सहभागी झाले. मात्र त्यांना अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ‘ट्विटर’वरून तडाखेबंद उत्तर दिले. ‘जर तुम्हीसुद्धा चौकीदार असाल तर मग कोणतीही महिला सुरक्षित नाही’, असे रेणुका यांनी अकबर यांना सुनावले आहे.
Agar aap bhi chowkidaar hain toh koi mahila surakshit nahi #BesharmiKiHadd @IndiaMeToo https://t.co/CQyIBm0waL
— Renuka Shahane (@renukash) March 16, 2019
‘मैं भी चौकीदार’ या अभियानात सामील होताना मला अभिमान वाटतोय. समृद्ध आणि सुरक्षित देश घडविण्यासाठी झटेन, असे एम. जे. अकबर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.


























































