इंग्लंडच्या विजयानंतर खेळाडूंच्या प्रेयसींनी पार्टीत उडवले 20 लाख रुपये

कतार इस्लामी राष्ट्र असल्याने फिफा विश्वचषक स्पर्धेतील लढती दरम्यात स्टेडियममध्ये मद्य अथवा वाईनला परवानगी नाहीय. त्यामुळे इंग्लंड फुटबॉल संघातील खेळाडूंच्या पत्नी आणि प्रेयसी, मैत्रिणींनी दोहा येथील समुद्रात खासगी क्रूझवर मुक्काम ठोकलेला आहे. या आलिशान हायटेक जहाजाची किंमतच 98 अब्ज रुपये आहे. स्पर्धा संपेपर्यंत हे सर्व महिला मंडळ या क्रूझवर मुक्काम ठोकून राहणार आहेत. इंग्लंडने आपल्या सलामीच्या लढतीत इराणला पराभूत केल्यावर तर या महिला मंडळाने मोठय़ा थाटात जामची पार्टी केली. इंग्लंडच्या शानदार विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी या महिलांनी एका रात्रीच्या पार्टीसाठी तब्बल 20 हजार ब्रिटिश पौंड्स म्हणजेच 20 लाख रुपये मद्याच्या पार्टीवर उधळल्याचे वृत्त आहे. क्रुझवरील या महिला मंडळात हैरी मैगुइरेची पत्नी फर्न, जॉर्डन पिकपर्ह्डची पत्नी मेगन आणि जॅक ग्रिलीशची मैत्रीण मॉडेल स्विटहार्ट साशा एटवूड यांचा समावेश आहे.