उरणमध्ये बीपीसीएलच्या खासगीकरणाविरोधात जोरदार निदर्शने

737

केंद्र सरकारच्या मालकीच्या बीपीसीएल कंपनीच्या खासगीकरण विरोधात उरणमध्ये कामगारांनी सोमवारी काळ्याफिती लाऊन निदर्शने केली. उरण बीपीसीएल प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच करण्यात आलेल्या आंदोलनात तीन कामगार संघटनांचे कामगार सहभागी झाल्याची माहिती बीपीसीएल कामगार संघर्ष कृती समितीचे निमंत्रक राजेश ठाकूर यांनी दिली.

नफ्यात चालणाऱ्या बीपीसीएलचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. खासगीकरणाला देशभरातील तेल कंपन्यांतील कामगारांच्या विरोधानंतरही केंद्र सरकारने बीपीसीएल विक्रीच्या निविदाही काढण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या विरोधात उरण येथील बीपीसीएल कामगारांनी सोमवारी काळ्याफिती लावत जोरदार निदर्शने केली.यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. बीपीसीएल कामगार संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात तीन कामगार संघटनांचे कामगार सहभागी झाल्याची माहिती बीपीसीएल कामगार संघर्ष कृती समितीचे निमंत्रक राजेश ठाकूर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या