कृषी अभ्यासक्रमाचे प्रवेश जाहीर , पहिली यादी 11 ऑक्टोबरला

सीईटी निकालाच्या पार्श्वभूमीवर कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यानुसार उद्या, 15 सप्टेंबरपासून प्रवेशाला सुरुवात होणार असून पहिल्या प्रवेशाची यादी 11 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तयारी आतापासून करावी आणि प्रवेश वेळापत्रकानुसार पूर्ण करावेत, अशा सूचना सीईटी सेलकडून देण्यात आल्या आहेत.

कृषी अभ्यासक्रमाच्या नऊ शाखांसाठीच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत 5 ते 20 ऑगस्टदरम्यान एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल  आज जाहीर झाला. त्यानुसार सीईटी सेलकडून बी.एस्सी ऍाग्रीकल्चर, बी.एस्सी (हॉर्टिकल्चर), बी.एस्सी (फॉरेस्ट्री), बी.एफ.एस्सी (फिशरी), बी.टेक (फूड टेक्नोलॉजी), बी.टेक (बायो टेक्नोलॉजी), बी.टेक (ऍमग्रीकल्चर इंजिनीयरिंग), बी.एस्सी कम्युनिटी सायन्स, बी.एस्सी ऍग्री बिझिनेस मॅनेजमेंट या नऊ शाखांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

  • कृषी विभागाच्या नऊ अभ्यासक्रमांसाठी 193 महाविद्यालयांमध्ये 16 हजार 626 जागा.
  • या जागांसाठी 15 सप्टेंबरपासूनच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात.
  • त्यानुसार 15 ते 25 सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत.
  • त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी 8 ऑक्टोबरला.
  • पहिल्या प्रवेश फेरीची यादी 11 ऑक्टोबरला सायंकाळी 5.30 वाजता.
  • दुसरी प्रवेश फेरी 18 ऑक्टोबर रोजी.
  • केंद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरी 4 ते 11 नोव्हेंबरदरम्यान