नगर – शेंडी गावात दोन गटात राडा, मंदिरावर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर – संभाजीनगर महामार्गावर शेंडी गावामध्ये दोन गटात रस्त्यांच्या संदर्भात झालेल्या वादाचे रुपांतर भांडणामध्ये झाले. एका गटाने मंदिरावर दगडफेक करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 17 जणांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस बंदोबस्ताचे आदेश दिले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी आरोपींचा शोध सुरू केला असल्याचे सांगितले.

शेंडी या गावांमध्ये गौराईचे पूजनही होत असते. अतिशय पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी काही गटातटाचे राजकारणसुद्धा असून रस्त्याचा वादही आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी रात्री साडेआठच्या सुमाराला दोन गटांमध्ये जोरदारपणे भांडणे झाली. भांडणाचे रूपांतर दगडफेकीमध्ये झाले.

शेंडी गावाजवळ असलेल्या लक्ष्मीमाता मंदिरावर दगडफेक करण्यात आली. तसेच या ठिकाणी असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेची सुद्धा मोडतोड करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रात्री उशिराने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत 17 जणांचा समावेश आहे.

करण देठे, सागर गवाजी देठे, सागर दिनकर देठे, बाळासाहेब देठे, जीवन वाकडे, नंदु वाकडे, आकाश गायकवाड, अक्षय गायकवाड, जय बागुल, बबलु जाधव, सोन्या दिनकर देठे, विशाल देठे, सुरेश भाऊराव देठे, ऋषीकेश देठे, बाळु शालुमन देठे, दिनकर देठे, सुभाष गायकवाड (सर्व रा. शेंडी ता. जि. नगर) अशी या 17 आरोपींची नावं आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तात्काळ या घटनेची गांभीर्याने दखल घेत या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेश दिले असून परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे.