एअर इंडियाची सर्वात मोठी डील, एअरबसकडून खरेदी करणार 250 विमानं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडिया ही कंपनी एअरबसकडून 250 विमान खरेदी करण्याचे समोर आले आहे. यात 40 विमानं ही मोठ्या आकाराची आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

गेल्या वर्षी टाटा समूहाने एअर इंडिया ही सरकारी कंपनी खरेदी केली. टाटा कंपनीने एअर इंडिया खरेदी केल्यापासून ही त्यांची पहिलीच मोठी खरेदी असल्याचे बोलले जात आहे. गेल्या 17 वर्षात पहिल्यांदाच एअर इंडियाने एवढ्या मोठ्या प्रमाणात विमानांची ऑर्डर दिली आहे.

एअर इंडियाकडून लांब पल्ल्यासाठी म्हणजेच 16 तासाहून अधिक प्रवासासाठी मोठी विमानं वापरली जातात. यंदाच्या खरेदीत अशाप्रकारची 40 विमानं एअर इंडिया खरेदी करणार आहे.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

या कराराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे फ्रांसचे पंतप्रधान इमॅन्यूल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करत या डिलसाठी शुभेच्छा दिल्या.

2005 मध्ये दिलेली शेवटची ऑर्डर

एअर इंडियाने याआधी 2005 मध्ये 111 विमानांची खरेदी केली होती. त्यात 68 बोईंग विमान व 43 एअरबस विमान होते.