
’रावण’ आणि ’गुरू’नंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा मणीरत्म यांच्या सिनेमात झळकणार आहे. ‘पोन्नियन सेलवन’ असे या चित्रपटाचे नाव असून दोन भागात हा चित्रपट प्रदर्शित होईल. नुकताच चित्रपटातील फर्स्ट लूक ऐश्वर्याने सोशल मीडियावरून शेअर केला आहे. ऐश्वर्यासोबत विक्रम, जयम रवी, कार्ती आणि शोभिता धुलिपाला या कलाकारांचेदेखील लूक शेअर करण्यात आले आहेत. हा चित्रपट कल्की यांच्या कादंबरीवर आधारित आहे. लाइका प्रॉडक्शनने आणि मद्रास टॉकीज निर्मित या चित्रपटाचा पहिला भाग 30 सप्टेंबर 2022ला प्रदर्शित होणार आहे.

























































