अॅजिओ बिझनेसतर्फे ‘संबंधम 2020’ यंदा डिजिटल अवतारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sambandam

देशात सध्या असलेली कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेत अॅजिओ बिझनेस ‘संबंधम’ हा त्यांचा वार्षिक व्यापारी मेळा (ट्रेड शो) ऑनलाईन भरवण्यात येणार आहे. या माध्यमातून हिंदुस्थानातील रिटेलर्स उत्सवी हंगामासाठी म्हणजेच दसरा, दुर्गा पूजा, गरबा यासाठी वस्तू, कपड, पादत्राणे आपल्या घरून किंवा कार्यालयात बसून खरेदी शकतात. ‘संबंधम 2020’ हा ट्रेड शो 17-19 सप्टेंबर 2020 या कालावधीत https://register.ajiosambandam.com/ या वेबसाईटवर लाइव्ह असेल. लोकप्रिय चित्रपट कलाकार विकी कौशल आणि जान्हवी कपूर ‘संबंधम 2020’ चे उद्धाटन करणार आहेत.