
सोलापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. अजित वसंतराव पाटील (वय 50 वर्षे) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, पाटील हे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सोलापूर कार्यालयात उपप्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नुतनीकरण करण्यास मदत केल्याच्या बदल्यात आणि कारखान्याकडून हवा व पाणी प्रदुषण होत असलेबाबत लोकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरीता पाटील यांनी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. ही लाच घेत असताना पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही सापळा कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक लाप्रवि, सोलापूर. पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना अतुल घाडगे, पोकाँ किणगी या पथकाने पार पाडली.




























































