
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठ्यांचा इतिहासच बदलला! हिंदवी स्वराज्याची स्थापना संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली, असा नवाच इतिहास त्यांनी सांगितला. आपली जीभ घसरल्याचे लक्षात येताच अजितदादांनी लगेच माफी मागून सारवासारवही केली.
परतूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी आज जाहीर सभा घेतली. सभेसाठी व्यासपीठावर आल्यापासूनच अजितदादांचा नूर बदललेला होता. उमेदवारांना खुर्च्या न मिळाल्याने त्यांनी व्यासपीठावरच कार्यकर्त्यांना झापून काढले. त्यानंतर बोलताना अजित पवार इतिहासावरच घसरले. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी -िहंदवी स्वराज उभे करून रयतेचे राज्य केले, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी मांडलेला नवा इतिहास ऐकून सभेत अस्वस्थता पसरली. जीभ घसरल्याचे लक्षात येताच अजित पवारांनी सारवासारव करत ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी रयतेचे राज्य केले. बोलताना माझी चूक झाली, माफ करा…’ असे ते म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून त्यांनी राज्यशकट हाकले, असेही त्यांनी सांगितले.
उमेदवारांना खुर्च्या न मिळाल्याने संताप
आपल्या पक्षाच्या उमेदवारांना खुर्च्या न देण्यात आल्यामुळे अजित पवार चा-ंगलेच संतापले. उमेदवारांना व्यासपीठासमोर डी झोनमध्ये खुर्च्या द्या, असे त्यांनी पोलिसांनाच बजावले. खुर्च्या न मिळाल्याने अजितदादांनी व्यास-पीठावरच कार्यकर्त्यांनाही झापून काढले.




























































