
महाविकास आघाडी सरकार पडणार म्हणून अनेकांनी यापूर्वी तारखा जाहीर केल्या. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी खूप काही बोलले जात होते. पण हे आपण गेली अडीच वर्षे पाहत आलेलो आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो की जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधी या तिघांनी ठरवले आहे तोपर्यंत हे सरकार व्यवस्थितपणे चालेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे बोलताना विरोधकांना ठणकावून सांगितले. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमतीतही पुन्हा वाढ होणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
तर एसटी कर्मचाऱयांवर कठोर कारवाई
एसटी कर्मचाऱयांनी 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावे. नाही तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही असे ते म्हणाले.
रशिया- युव्रेन युद्ध व देशातील पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि मध्यंतरी कमी झालेल्या पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याने सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत मात्र आता पुन्हा वाढ होण्याची भीती आहे.
दुर्दशा आठवली आणि वाझेला सेवेत घेतले
पोलीस दलाच्या प्रतिमेविषयी बोलताना त्यांनी सचिन वाझेचे उदाहरण दिले. एका व्यक्तीमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. पण तसे होणार नाही याची काळजी घ्या, सर्वांनी चांगले काम करा. कारण आधी काही गैरप्रकार झाला की इथे बोपर्ह्स झाला असे म्हटलं जायचे. अगदी खेडेगावात जरी काही झाले तरी बोपर्ह्स झाले म्हणायचे. आता असे म्हणतात की, याचा सचिन वाझे झाला. हा सचिन वाझे आहे. कुठून दुर्दशा आठवली आणि त्याला सर्व्हिसमध्ये घेतले, असे अजित पवार म्हणाले.































































