
पुण्यातील कसबा पेठ व चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची याबाबत चर्चाही सुरू असल्याचे समजते. मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
”ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारणच नाही. भाजपने कोल्हापूर, पंढरपूर, देगलूर येथील पोट निवडणूका बिनविरोध होऊ दिल्या नाहीत. मुंबई येथील पोट निवडणूकीत उमेदवार मागे घेतला. म्हणजे बाकीच्या सर्व निवडणूका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं. शेवटी लोकशाही आहे. जनता ज्यांना निवडून द्यायचे त्यांना निवडून देईल, असे अजित पवार म्हणाले.



























































