अकोला जिल्ह्यात 72 नवीन पॉझिटीव्ह, रुग्णांचा आकडा पाचशे पार; आज 26 रुग्णांना डिस्चार्ज

634

आज दिवसभरात (सायंकाळी सात वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 308 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 236 अहवाल निगेटीव्ह तर 72 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या पाच जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित 21 जणांना संस्थागत विलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 507 झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात 164 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

बुधवारी सकाळी  प्राप्त अहवालात 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. त्यात 10 महिला तर 20 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 13 जण हे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत. तर मोहता मिल प्लॉट नाजुकनगर,  मोठी उमरी,  गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल,  सहकार नगर, डाबकी रोड,  वृंदावन नगर,  देशमुख  फैल, चांदखा प्लॉट वाशिम बायपास,  फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद, वाचा ठळक मुद्दे

सायंकाळी प्राप्त 42 पॉझिटीव्ह अहवालात 19 महिला व 23 पुरुष आहेत. त्यात अकोट फैल येथील अकरा,  रामदास पेठ येथील पाच, माळीपुरा येथील पाच, मुर्तिजापूर येथील तीन, फिरदौस कॉलनी येथील दोन,  अशोक नगर येथील दोन, डाबकी रोड येथील दोन,  तर उर्वरित  महसूल कॉलनी, रजतपुरा,  गायत्रीनगर, सिंधी कॅम्प, गर्ल्स होस्टेल आरटीएएम, शिवसेना वसाहत, देशमुख फैल, संताजीनगर, जठारपेठ, न्यू तारफैल, गुलिस्तान कॉलनी. मोमीनपुरा येथील प्रत्येकी एक जण आहे.

फुकट जमिनी लाटणाऱ्या रुग्णालयांत मोफत उपचार करा! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

26 जणांना डिस्चार्ज
आज दुपारी 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील 21 जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. यात नऊ महिला व 15 पुरुषांचा समावेश आहे.

164 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत 507 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील 28 जण (एक आत्महत्या व २27 कोरोनामुळे) मयत आहेत.  तर आज 26 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 315 झाली आहे. तर सद्यस्थितीत 164 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या