अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ सिनेमागृहांमध्ये घालतोय धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या  ‘मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ या सिनेमाला सुरुवातीला थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. गेल्या महिन्यात 6 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर  महिना उलटूनही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पूजा एन्टरटेन्मेण्ट आणि अक्षय कुमार स्टारकास्ट असलेला ‘मिशन रानीगंज’ हा सिनेमा कोळसा खाण दुर्घटनेवर आधारीत आहे. या घटनेने देशालाच हादवले नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकांचे लक्ष वेधले होते. हा सिनेमा जसवंत सिंह गील यांच्या वीरतेवर आधारलेला आहे. अभिनेता अक्षय कुमारने दमदारपणे अभिनय केला आहे. हा सिनेमा महिना उलटूनही सिनेमागृहांमध्ये आहे. या सिनेमाने प्रेक्षकांना प्रभावित केले असून देशभरातून त्याच्यावर समीक्षण लिहीले गेले आहे. समीक्षकांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे. हा सिनेमा दिवसाला 25 लाख कमाई करत आहे.  मिशन रानीगंज मध्ये वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांची निर्मिती असलेला या सिनेमाला संगीत टीनू सुरेश देसाई यांनी दिले आहे.