आळंदी माईर्स एमआयटीत स्पोर्ट्स कार्निवल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदी येथील माईर्स एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्पोर्ट्स कार्निवल, आंतर महाविद्यालयीन बास्केटबोल स्पर्धेचे 14 व 15 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

आळंदी महाविद्यालयतील क्रीडा विभागाच्या वतीने स्पोर्ट्स कार्निवल व आंतर महाविद्यालयीन बास्केटबोल स्पर्धा 14 व 15 ऑक्टोबर 2022ला होत आहेत. या वेळी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. राजेश कडलक, उपप्राचार्य डॉ. मानसी अतितकर यांनी स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धा आंतर महाविद्यालयीन असून यामध्ये मुले आणि मुली याचे संघ सहभागी होणार आहेत.

आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 14 महाविद्यालयातील संघांनी स्पर्धेसाठी नावनोंदणी केली आहे. प्रथम विजयी संघाला 40 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. या स्वरुपाची खूप पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे म्हणाले, बास्केटबॉल स्पर्धेचा मुख्य उदेश भारतातील क्रीडा संस्कृतीला तळागाळात पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने 2018 मध्ये खेलो इंडिया योजना सुरू केली.

हिंदुस्थानात खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांसाठी एक ठोस फ्रेमवर्क तयार करून आणि आपला देश एक क्रीडा राष्ट्र म्हणून प्रस्थापित करून क्रीडा संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट आहे. या धर्तीवर स्पोर्ट्स कार्निवल व आंतर महाविद्यालयीन बास्केटबोल स्पर्धेचे 14 व 15 ऑक्टोबर 2022 रोजी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे.