लोकसभा निवडणुकीआधी ‘सीएए’ कायदा लागू करू

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) लागू केला जाईल, असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी व्यक्त केला. ‘सीएए’ हा देशाचा कायदा आहे. आम्ही तो निश्चित सूचित करू आणि निवडणुकीपूर्वीच अधिसूचना केल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे शहा म्हणाले.