
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या निर्णयामुळे नेते भावूक झाले असून पवारांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी करत आहेत. मात्र पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने नेत्यांनी आता राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाडानंतर आता राष्ट्रवादीचे प्रतोद आणि अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
अनिल पाटील यांनी शरद पवार यांना राजीनामा पत्र पाठवले आहे. ‘पवार साहेब तुम्हाला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. किमान 2024 च्या निवडणुका होईपर्यंत तरी राजीनामा देवू नका, अशी विनंती शरद पवार यांना केली आहे,’ असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपल्या पक्षाच्या विचारधारेवर व आपल्या नावाच्या ताकदीवर विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आला. आपण घेतलेल्या निर्णयामुळे माझ्यासह लाखो कार्यकर्ते खचून गेले आहेत. आपण घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा मला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.
निर्णय घेताना पवारांनी विश्वासात घेतलं नाही, जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा
दरम्यान, राज्याची धुरा अजित पवार यांच्याकडे तर दिल्लीची धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे पाटील म्हणाले. आम्ही शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
It is not decided yet who will be in the state and centre…. We are trying to change his(Sharad Pawar) mind… Ajit Pawar, Supriya Sule has said that Sharad Pawar should remain the President of NCP: NCP leader Anil Patil pic.twitter.com/xqmXNtAOXd
— ANI (@ANI) May 3, 2023

































































