
सामना प्रतिनिधी। नगर
सापासह अन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर आज नगर येथे पोलिसांच्या पथकाने परराज्यातील एकाला अटक केली. त्याच्यजवळून सहा ते सात प्रकारचे साप व अन्य पक्षांचे अवशेष अढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याच्याजवळून सुमारे 3 लाख रुपयांचा कॅमेरासुध्दा हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान रेल्वे पोलिसांनी याची कसुन चौकशी सुरु केली आहे. चंद्रभान रंकामनी नाईक (33) असे आरोपीचे नाव आहे. तो ओदिशाचा रहीवासी आहे.
पुणे हटीया गाडी क्रमांक 22845 पुणे-हटिया एक्स के कोच नं.एस 10 के बर्थ नं.1 यामध्ये एक प्रवासी निळ्या रंगाच्या पिशवीत सापाची तस्करी करत आहे अशी माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तात्काळ पोलिसांनी याचा छडा लावण्यासाठी नगर येथील रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. आज दुपारच्या सुमाराला गाडी नगरच्या स्थानकावर आली असता त्याला सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील असलेल्या बँगेची झाडाझडती घेतल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे साप, मांडूळ आणि गिरगीट सापडले आहे. त्याचबरेाबर मांडूळ -1 , वुल्फ स्नेक – 1, चित्रापंग नायकुल – 1, वुल्फ स्नेक – 1, वुल्फ स्नेक पिवळ्या रंगाचे – 1, ग्रीन लिझार्ड (गिरगिट) – 1, रातसर्प – 1, कबुतर -4 तसेच वेगवेगळ्या साईजचे पंख त्यांच्या कब्जातून हस्तगत केले आहे.
यासंदर्भात माहिती वनविभागाला देण्यात आली होती. या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी रेड्डी, सचिन सहाणे, एन.व्ही.गायकवाड, सचिन शिंदे यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यांनी या प्राण्याची माहिती घेतली आहे. आरोपीकडे विचारपुसर केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्याच्या कब्जातुन 3 लाख रुपयांचा डेल कंपनीचा कॅमेरा तसेच लॅपटॉप मोबाईल व प्राण्याची माहिती असलेले पुस्तक हस्तगत करण्यात आले आहे. वरीष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त पुणे डी.विकास यांच्या आदेशाने मंडल सुरक्षा आयुक्त सेालापूर कृपाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर एस मीना, रेल्वे पोलिस अधिकारी निधीश, जोशी, आर.एस.जाट, श्री.टी.यादव, राम केकाण, सचिन आव्हाड, महेश भिसे, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.





























































