
झी मराठी वरील रात्रीस खेळ चाले ही मालिका खूप विशेष म्हणजे या मालिकेतील अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. रात्रीस खेळ चाले या मालिकेचे दोन भाग आले होते. दोन्ही भागांची सुरूवात आणि शेवट ही अण्णा नाईकांच्या मृत्यूने होते. पण आता अण्णा नाईक परत येणार आहेत.
हो झी मराठी वाहिनीने नुकताच एक टीझर लाँच केला आहे. त्यात अण्णा नाईक आणि रात्रीस खेळ चालेचे संगीत सुरू आहे. पण ही मालिका रात्रीस खेळ चालेच असणार आहे का? अण्णा नाईकांच्या व्यक्तिरेखेचे काही पैलू दाखवणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांन पडले आहेत.






























































