कळी खुलली! RCB ने फायनलमध्ये धडक मारल्यावर कॅमेरा अनुष्काकडे वळला

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जमध्ये मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय मैदानावर रंगला. या लढतीत बंगळुरूने पंजाबचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत चौथ्यांदा फायलनमध्ये प्रवेश केला. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी किंग विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही मैदानात उपस्थित होती. संपूर्ण लढतीदरम्यान ती आरसीबीचे मनोबल वाढवताना दिसली. आरबीसीने फायनलमध्ये प्रवेश केल्यावर तर अनुष्काची कळीच खुलली आणि ती आनंदाने नाचू लागली. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून अनुष्काची रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

आरसीबीने फायनल गाठल्यानंतर सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे फोटो व्हायरल झाले आहेत. विराटसोबत अनुष्काही आरसीबीचा विजयोत्सव साजरा करताना यात फोटोंमध्ये दिसते. अनुष्का स्टँडमध्ये उभी राहते आणि आनंदाने नाचू लागते, टाळ्या वाजते. एवढेच नाही तर विराटही अनुष्काच्या दिशेने बघून आता फक्त एक विजय दूर असल्याचा इशारा करतो.

दरम्यान, या लढतीत बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. त्यानंतर पंजाबचा संपूर्ण डाव 14.1 षटकांमध्ये 101 धावांमध्ये गुंडाळला आणि हे आव्हान 10 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण करत बलाढ्य विजय मिळवला.

IPL 2025 – बंगळुरू एक पाऊल पुढे, पंजाबचा धुव्वा उडवत चौथ्यांदा अंतिम फेरीत