
आयफोन 17 सीरिजच्या लाँचिंगची चाहत्यांना उत्सुकता लागलेली असताना अॅपल कंपनीने पुण्यात चौथे अॅपल स्टोअर उघडण्याची घोषणा केली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे 4 सप्टेंबरला चौथे स्टोअर उघडले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अॅपलचे तिसरे स्टोअर बंगळुरूच्या हेब्बाल परिसरात उघडण्यात आले. अॅपलचे मुंबई आणि दिल्लीत याआधीच स्टोअर आहेत. पुण्यातील स्टोअरमध्ये टूडे अँड अॅपल सेशन्स होतील.