मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी नरेश ललवाणी यांची नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी नरेश ललवाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1985 च्या आयआरएसई बॅचचे रेल्वे आधिकारी आहेत. मध्य रेल्वेचे याआधीचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी हे रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाची अतिरिक्त जबाबदारी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे देण्यात आली होती. दरम्यान, पेंद्र सरकारने आज नरेश ललवाणी यांची महाव्यवस्थापकपदी नियुक्ती केली आहे.