जनरिक आधार फार्माचे उद्योजक अर्जुन देशपांडे यांना यंदाचा “द यंग अचिवर अवॉर्ड”

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mr-arjun-deshpande

जनरिक आधार फार्माचे उद्योजक अर्जुन देशपांडे यांना “द यंग अचिवर अवॉर्ड 2020” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जेनरिक आधार ही एक औषधांची विक्री करणारी कंपनी आहे. अर्जुन देशपांडे यांनी ही कंपनी वयाच्या 16 व्या वर्षी स्थापन केली. ही कंपनी उत्पादकांकडून थेट औषधांची खरेदी करते आणि ग्राहकांना विकते. ही कंपनी युनिक फार्मसी अॅग्रिगेटर बिझनेस मॉडलचा वापर करते. यामध्ये थेट उत्पादकांकडून जनरिक औषधं खरेदी करून ती किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवली जातात.

रतन टाटांनी अशा कंपनीत गुंतवणूक केली आहे जी फक्त दोन वर्षांपूर्वी स्थापन झाली आणि त्या कंपनीचा मालक फक्त 18 वर्षाचा आहे.

“जनरिक आधार डिसेंबर पर्यंत 800 फ्रेंचायजी मेडिकल स्टोअर सुरू करण्याची योजना आहे. या व्यवसायाचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीपर्यंत करणार आहोत,” असे अर्जुन देशपांडे यांनी यावेळी सांगितले.