जम्मू-कश्मीरमध्ये शस्त्रसाठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये खारी तहसील परिसरातून लष्कर आणि पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. खारी परिसरात दहशतवाद्यांनी मोठा शस्त्रसाठा आणल्याची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. त्यामध्ये सदरचा शस्त्रसाठा हाती लागला असून यामध्ये एके-47 रायफलच्या 310 गोळय़ा, 9 एमएमच्या 30 गोळय़ा, एक मॅगझीन, सहा रायफल, टेपरेकॉर्डर आदींचा समावेश आहे.