लष्करप्रमुखांनी घेतली शहीद औरंगजेबच्या कुटुंबियांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या राष्ट्रीय रायफल्सचा शहीद जवान औरंगजेब याच्या कुटुंबियांची भेट घेतली. शहीद औरंगजेब याच्या आई-वडिलांची भेट घेत लष्करप्रमुख रावत यांनी त्याचे सांत्वन केले. लष्करप्रमुख रावत जवळपास अर्धा तास शहीद जवानाच्या घरी थांबले होते. या दरम्यान, त्यांनी शहीद जवानाच्या भावालाही धीर दिला आणि औरंगजेबचे बलिदान व्यर्थ जाणार नाही हे ठासून सांगितले.

चुन चुनकर बदला लेंगे… चार दहशतवादी ठार, लष्कराचे ऑपरेशन ऑलआऊट सुरू

यापूर्वी रमजान महिन्यात एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करणे हिंदुस्थानला महागात पडली. हिजबूल मुजाहिद्दीनचा खतरनाक कमांडर टायगरला कंठस्नान घालणारा जाँबाज जवान औरंगजेबची निर्घृण हत्या करण्यात आली. ईदनिमित्त सुट्टी घेऊन जवान औरंगजेब घरी पोहोचत असताना दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.औरंगजेब याची हत्या करण्याआधी दहशतवाद्यांनी त्याला मारहाण केली. त्याचा १ मिनिट १५ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.