चुन चुनकर बदला लेंगे… चार दहशतवादी ठार, लष्कराचे ऑपरेशन ऑलआऊट सुरू

13

सामना ऑनलाईन । श्रीनगर

रमजानच्या पवित्र महिन्यात शस्त्रसंधी जाहीर करण्यात आल्यानंतर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांनी हिंदुस्थानच्या सैनिकांवर जोरदार हल्ले चढवले. यामध्ये सैन्याचे २२ जवान शहीद झाले तर औरंगजेब सारख्या जांबाज जवानाचं अपहरण करून हत्या करण्यात आली. मात्र रमजान संपताच सैन्याने आपली शस्त्रं हाती घेऊन ऑपरेशन ‘ऑलआऊट’ पुन्हा सुरू केलं आहे. आज सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये हिंदुस्थानच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

सोमवारी सकाळी हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन ऑलआऊटला पुन्हा सुरुवात केली आहे. यावेळी बंदिपोरा येथे उडालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आलं आहे. दरम्यान, चकमक सुरू असून आणखी काही दहशतवादी मारले जाण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या